रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे लॉजमध्ये विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपी तरुण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचा संशय


रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोरेगाव पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.सोमवारी दुपारच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. मुंबई गोवा महामार्गालगत लोणेरे इथं हा लॉज आहे. एक तरुण आणि एका तरुणीने लॉजमधील एक रूम भाड्याने घेतली. दुपारच्या सुमारास हा तरुण तिथून बेपत्ता झाला तर रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला.

या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या हत्याकांडातील संशयित फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत. पोलिसांनी याबाबत लॉजच्या मालकाकडे चौकशी सुरू केली आहे.या तरुणीला लॉजवर घेवून जाणाऱ्या तरुणाचा शोध सुरू असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती मिळते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button