
रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. कमलापुरकर
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. श्रीमती बबिता सोनाजीराव कमलापुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या जळगांव येथे जिल्हा आरोग्य अधिकारीपदावर कार्यरत आहेत. रत्नागिरी येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांची सातारा येथे बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते.