भाजपचे जेष्ठ नेते दत्ता राणे यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई भाजपचे सरचिटणीस आणि माजी आमदार सुनिल राणे यांचे वडिल व भाजपचे जेष्ठ नेते दत्ता राणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. नारायण राणे यांच्या मंत्री मंडळात त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते.भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री दत्ताजी राणे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.

महाराष्ट्रात पक्ष व संघटन मजबूत करण्यात दत्ताजींचे मोठे योगदान राहिले आहे. युती सरकारच्या काळात मंत्री असताना दत्ताजींशी जवळून संबंध आला. अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाचे दत्ताजी कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांना श्रद्धाजंली अर्पण केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button