
अजित पवार आणि पक्षाचे काही नेते शरद पवारांना भेटण्यासाठी दाखल.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले.अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवार आणि पक्षाचे काही नेते शरद पवारांना भेटण्यासाठी दाखल झाले. अजित पवारांसोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे व प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार सुनेत्रा पवार देखील अजित पवारांसोबत शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या. पक्षाचे बडे नेते देखील यावेळी उपस्थित आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार हे पवार कुटुंबातील सदस्य आहेत, परंतु त्यावेळी त्यांच्या पक्षाचे इतर प्रमुख नेते आहेत




