
आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने खेडमध्ये लवकरच नवी नळपाणी योजना.
खेड शहरासाठी आमदार योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने ४३ कोटी रुपयांच्या प्रस्तावित नीन नळपाणी योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यात आमदार योगेश कदम व अधिकारी यांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नव्या नळपाणी योजनेच्या कामास प्रारंभ होणार आहे. यामुळे शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.खेड शहराला भेडसावणारी पाणी समस्या ३० वर्षापूर्वीच्या जुन्या नळपाणी योजनेतील जलवाहिनीमुळे निर्माण झाली आहे. यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे तर काही भागात दिवसातून एकच वेळ नळाला पाणी येत असल्याने प्रसंगी नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. काही भागात नगर प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.www.konkantoday.com