
एमटीडीसीच्या फायद्यात चालणाऱ्या कोकणातील गणपतीपुळे, तारकर्ली पर्यटन निवासाचे खाजगीकरणाचा डाव.
पर्यटन महामंडळाच्या निवासांचे होणार खाजगीकरणमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे ३० पर्यटक निवासांचे खाजगीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. या निविदा महामंडळाच्या वेबसाईटवर टाकण्यात आल्या असून या निर्णयाचा फटका कंत्राटी कर्मचार्यांना बसणार आहे. या निवासांमध्ये कोकणातील गणपतीपुळे, तारकर्ली यांचाही समावेश आहे. याची गंभीर दखल घेत खाजगीकरणाविरोधात पर्यटन विकास कर्मचारी संघाकडून काळ्या फिती आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस अशोक खामकर यांनी सांगितले.पर्यटन विकास महामंडळात गेली अनेक वर्षे भरती प्रक्रिया राबवली गेलेली नाही. महामंडळातील नियमित कर्मचारी निवृत्त होत गेले परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया झाली नाही, त्या बदल्यात कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले. शासनाकडून वारंवार इतर महामंडळामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. महारष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये सध्या सुमारे १०० ते १२० नियमित कर्मचारी कार्यरत असून सुमारे ७०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. हे कर्मचारी सुमारे १५ ते ३० वर्षापासून कार्यरत आहेत. त्यातील बरेचसे कर्मचारी २००७ पासून पर्यटक निवास कर्मचारी संघटनेचे सदस्य आहेत. राज्यातील ३० निवसांचे खाजगीकरण झाले तर कंत्राटी कर्मचार्यांचा प्रश्न गंभीर हेवू शकतो. कोकणातील गणपतीपुळे, तारकर्ली ही बारमाही पर्यटनाची केंद्रे आहेत. या ठिकाणी शंभराहून अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. महामंडळाकडून होत असलेल्या खाजगीकरणाला विरोध म्हणून कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.www.konkantoday.com