ग्रामपंचायतीचा गावात देशी दारू दुकानाला परवानगी न देण्याचा एकमुखी ठराव.

राजापूर शहरातील लोकसंख्या आणि विस्ताराच्या अनुषंगाने तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या पाचल ग्रामपंचायतीने गावात देशी दारू दुकानाला परवानगी न देण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत संमत केला. याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेत चर्चेला ठेवण्यात आला होता. सरपंच बाबालाल फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा विरोधाचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावानंतर ग्रामस्थ व महिलांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयाचे स्वागत केले. पाचल गावातीलच एका व्यक्तीने गावात देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. या अर्जावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान एका ग्रामस्थाने याला समर्थन देण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्व ग्रामस्थ व महिलांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर सरपंच बाबालाल फरास यांनी याला ज्यांचे समर्थन असेल त्यांनी हात वर करावे, अशी सूचना केली. त्यानंतर सभागृहातील एकानेही हात वर केला नाही. त्यामुळे देशी दारू सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेला अर्ज एकमुखाने फेटाळण्यात आला. यापुढे गावात देशी दारू दुकानाला परवानगी न देण्याचा ठराव संमत करण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button