रत्नागिरी जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी


पोलिसांना आलेल्या ई-मेलमुळे यंत्रणा अलर्ट


रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संपूर्ण न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली.
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने न्यायालयातील वकील, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना इमारतीबाहेर सुरक्षित ठिकाणी हलविले. कोणालाही न्यायालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.
दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकाकडून न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीची आणि परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयातील कामकाजावरही परिणाम झाला. तपासणीचे काम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. प्राप्त झालेल्या धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेत संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात येत होती. धमकीच्या ई-मेलबाबत पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button