कुटुंबातील तीन सदस्यांच्या अंगावर तब्बल 25 किलोच सोनं

तिरूमाला येथील मंदिराच्या आवारात एका कुटुंबाने जवळपास सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याला कारण होतं या कुटुंबातील तीन सदस्यांच्या अंगावर तब्बल 25 किलोच सोनं. पुण्यातील सनी वाघचौरे यांचे कुटुंब काल तिरूपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते.त्यावेळी घरातील तीनही सदस्यांच्या अंगावर असलेल्या सोन्याने मंदिराच्या आवारातील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं होतं.सनी नाना वाघचौरे हे पुण्यातील व्यावसायिक आहेत. खरं तर सोन्याचे आभूषण घातलेल्या भक्तांनी यापूर्वी मंदिराला भेट दिली आहे. पण सनी यांच्या अंगावरील सोन्याने मात्र प्रत्येकाचच लक्ष वेधून घेतलं. सनी यापूर्वी कपिल शर्मा शो, बिग बॉस 16 या शोमुळेही चर्चेत राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button