मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे सोमवारी वयाच्या ८५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. डॉ. स्नेहलता देशमुख या शिव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयाच्या अधिष्ठाता होत्या. १९९५ मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्वाचे निर्णय घेतले होते. चिपळुणातील अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. डीबीजे महाविद्यालयातील स्नेहसंमेलन कार्यक्रमाला त्या प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button