
चिपळूण नगर परिषदेने ओढे, नाल्यांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांची मागणी
चिपळूण शहराला अनेकवेळा महापुराचा तडाखा बसलेला असला तरी आपण त्यातून काहीही शिकलेलो नाही. आजला शहरात ओढे, नाले बुजवून उभी रहात असलेली अतिक्रमणे, नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष, यामुळे आजला थोडा जरी पाऊस झाला तरी अनेक भागांमध्ये पाणी साचते. त्यामुळे गााळ काढून नदी मोकळी होईल, मात्र शहरात तुंबणार्या पाण्याचे काय? असा सवाल शुक्रवारी येथे झालेल्या परिसंवादात उपस्थित करण्यात आला. त्यासाठी वाशिष्ठीला डोंगर उतारावरून येणारे जे ओढे, नाले मिळतात, त्या सर्वांचे सर्वेक्षक्षण करावे, अशी मागणी पुढे येवून यासाठी नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.www.konkantoday.com