
महावितरणच्या कारभाराबाबत आ. डॉ. राजन साळवी यांचा लांजा महावितरण कार्यालयाला दणका
लांजा तालुक्यातील महावितरणच्या असणार्या तक्रारी, वारंवार खडित होणारा वीज पुरवठा, १२ ते १५ तास खंडित असणारा वीज पुरवठा, अशा अनेक समस्यांना त्रस्त झालेल्या लांजावासियांनी शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लांजा महावितरण कार्यालयावर धडक दिली.यावेळी उपअभियंता दयानंद आष्टेकर यांनी लोकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी निलेश कुलकर्णी मोबा. ७८७५७६५३०६ यांची नोडल ऑफिसर म्हणून तातडीने नेमणूक करण्यात येत असल्याची, तसेच आजपासून रात्रीसाठी लांजा शहरासाठी अतिरिक्त १ वायरमन नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती दिली. याचसोबत तालुक्यातील पूर्व विभागातील गावांसाठी एकत्रित एक नवीन फिडर तळवडे रेल्वे स्टेशन ते आडवली या नवीन लाईन लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.www.konkantoday.com