
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.
राज्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पाडला आहे. सध्या मॉन्सून राज्यात प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड तर मुंबई, पुण्यासह पालघर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार, नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा कायम आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. समुद्र सपाटीवर असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ पर्यंत आहे. पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. २३ व २४ तारखेला कोकण गोव्यामध्ये ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ व २६ तारखेला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच २६ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २३ तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ तारखेला सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिलेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. कोल्हापूर व सातारा येथे २३ ते २६ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहून अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com