- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेला आंतरराष्ट्रीय योग दिवस रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील सर्व आठही मंडलात विविध शाळांमध्ये विविध संस्थांमध्ये, योग अभ्यास केंद्रांमध्ये संपन्न झाला.सदर झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच योग दिवसाच्या आयोजनामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच सर्वांना योग दिवस कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संयोजन ,योग दिवस संयोजिका तथा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाताई साळवी, योग दिवस सहसंयोजक व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.ऋषिकेश केळकर यांनी जिल्हाध्यक्ष राजेश दादा सावंत यांच्या मार्गदर्शनात केले.
Back to top button