
देवेंद्र फडणवीस लागले पुन्हा कामाला, राजीनामा नाकारला
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या हाराकिरीने महायुतीला धक्का बसला. घटक पक्षात ही कुरबुरी सुरु झालेल्या आहेत. तर या अपयशी खेळीमुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला.ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी, एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.महायुतीबाबत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीतून कोणाला बाहेरचा रस्ता दाखविला जातो की जागा वाटाघाटीत भाजप मुस्काटदाबी करते हे लवकरच समोर येईल.दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशा आशयाची चर्चा झालीwww.konkantoday.com