
कोकण मार्गावरून धावणार्या उधना-मंगळूर स्पेशलला ३० जुनपर्यंत मुदतवाढ
कोकण मार्गावरून धावणार्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. कोकण मार्गावरील रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी वसईमार्गे धावणार्या उधना-मंगळुर स्पेशलला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले.
आठवड्यातून बुधवार व रविवार तर परतीच्या प्रवासात गुरूवार व सोमवार धावणारी ०९०५७/०९०५८ उधना-मंगळूर स्पेशल ५ जूनपर्यंत धावणार होती. गर्दीच्या हंगामामुळे सर्वच रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी उसळत आहे. गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी स्पेशलला मुदतवाढ दिल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. ही स्पेशल वसईमार्गे धावत असल्याने बोरीवली, वसई, विरार, भाईंदरस्थित चाकरमान्यांना इच्छितस्थळ गाठणे सुलभ झाले आहे. www.konkantoday.com