
लोकांच्या वाढत्या मागणीमुळे सुक्या मासळीचे दरही कडाडले
पावसाळा तोंडावर आला असून नागरिकांमधून सुक्या मासळीची खरेदी करण्यास प्रारंभ झाला आहे. परंतु सुक्या मासळीचे दर गगनाला भिडल्याचे चित्र मासळी बाजारपेठांमध्ये पहायला मिळत आहे.मासेमारीचा हंगाम लवकरच संपुष्टात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात मासेमारी बंद राहणार असल्याने मासळी खवय्यांनी सुक्या मासळीच्या खरेदीकडे आपली गाडी वळवली आहे. गावोगावात देखील मासे विक्रेत्या महिला सुकी मासळी घेवून फिरत आहेत. बोंबील, बगे, कोलीम, मांदेली, आंबड, बांगडे, सुरमई, कोळंबी असे विविध सुकवलेले मासे मासळी बाजारात व दारोदार विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. यामध्ये कोलीम, बोंबील व आंबड, बगे या सुक्या मासळीची अधिक खरेदी होत आहेत. सुक्या मासळीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आता पाऊस पडल्याने सुक्या मासळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता मासळी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. www.konkantoday.com