खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात मार्गस्थ होणार्‍या बसफेर्‍यांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र अजूनही सुरूच

खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात मार्गस्थ होणार्‍या बसफेर्‍यांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र अजूनही सुरूच आहे. सोमवारीही सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून सुटलेली खेड-आपेडे बस धरणे येथील नवभारत हायस्कूलसमोर अचानक बंद पडली. यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. २० ते २५ मिनिटानंतर दुसरी बस दाखल झाल्यानंतर प्रवासी मार्गस्थ झाले. उन्हाळी सुट्टीमुळे ग्रामीण भागात धावणार्‍या बसफेर्‍यांना गर्दी उसळत आहे. येथील बसस्थानकातून आधीच बसफेर्‍या विलंबाने मार्गस्थ होत आहेत. त्यातच तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button