जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध; ३ डिसेंबरपर्यंत दावे व हरकतींची संधी


रत्नागिरी, दि. २९ ) : जिल्हा नियोजन समितीवरील ग्रामीण व नागरी मतदारसंघांतील सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी उद्या सोमवारी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यात डिसेंबर २०२५ मध्ये नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले असून, नवनिर्वाचित सदस्यांमधून नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम, १९९८ मधील कलम ३(२) व महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम, १९९९ मधील नियम ५ मधील तरतुदींनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.
प्रारूप मतदार यादी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, रत्नागिरी), सर्व मुख्याधिकारी (नगरपरिषदा व नगरपंचायती) तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे –
दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत: ३ डिसेंबर २०२६
दावे व हरकती सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, मुख्य प्रशासकीय इमारत (जुनी इमारत), दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जयस्तंभ, ता. जि. रत्नागिरी
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: ४ डिसेंबर २०२६
प्राप्त दावे व हरकतींची नियमानुसार तपासणी करून त्यावर निर्णय घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. संबंधित सर्व पात्र मतदारांनी प्रारूप मतदार यादीची पाहणी करून त्यामध्ये काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button