
देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीची अधिकार्यांकडून पाहणी
देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास जावून रूग्णांना चंगली सेवा मिळावी यासाठी आपलं देवरूख सुंदर देवरूख ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे प्रशाासन जागे झाले असून अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार देवरूख येथील बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकारी वर्गाने बुधवारी इमारतीची पाहणी केली.ग्रामीण रूग्णालय हे गोरगरीबांसाठी मोठा आधार आहे. नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास गेले असून काही सोयीसुविधांची वानवा आहे. येथे एसटीपी प्लॅन्ट, वीज मीटरची नितांत गरज आहे. आपलं देवरूख सुंदर देवरूख ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी इमारतीत कारभार सुरू होण्यासाठी कोणत्या बाबींची कमतरता आहे हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांची भेट घेत निदर्शनास आणून दिले होते. www.konkantoday.com