
आचारसंहितेचा शहरात भंग होवू नये व शहराचे विद्रूपिकरण टाळावे यासाठी चिपळूण नगर पालिका प्रशासन सज्ज
* चिपळूण शहरात आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी चिपळूण नगर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. सुरूवातीलाच शहर व परिसरातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे बॅनर हटविल्यानंतर आता बेकायदेशीर फलक व बॅनर जप्त करण्याची मोहीम होती घेतली आहे. त्यानुसार दुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारनंतर शहरातील शेकडो बॅनर जप्त करण्यात आले.चिपळूण शहरात नगर पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता असंख्य फलक व बॅनर गल्लोगल्ली व रस्तोरस्ती झळकताना दिसत आहेत. हे बेकायदेशीर बॅनर हटविण्याची मोहीम पालिका प्रशासनाने अनेकवेळा हाती घेतले. मात्र केवळ जप्तीची कारवाई होत अस्याने कारवाईचा धाक राहिलेला नाही. अतिक्रमण हटाव पथकाची पाठ फिरताच पुन्हा शहरात ठिकठिकाणी आस्थापनांचे, कंपन्या, संस्था, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पुढारी, पदाधिकारी जाहिरातींचे फलक आपली जागा घेतात. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. यासंदर्भात काही महिन्यापूर्वी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनीही नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार करीत बॅनर लावणार्यांवर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेवून केवळ बॅनर जप्तीची कारवाई करण्यात आली. www.konkantoday.com