सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल तब्बल 100 च्या वर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल तब्बल 100 च्या वर विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.मात्र काहिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व झुलाब सुरू झाल्याने येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला 43 मुले होती त्यात आणखी भर पडली असून 100 च्या वर आकडा पोचला आहे. जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज शाळेतील शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे. नवोदय विद्यालयात तब्बल 408 विद्यार्थी असून त्यातील 100 च्या वर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button