एसीबीचे आमदार राजन साळवी यांना पुन्हा सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते-आमदार राजन साळवी यांच्या घर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी धाड टाकून चौकशी केली.त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा एसीबीने राजन साळवी यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. एसीबीने साळवी यांना सोमवारी दुपारी बारा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
कोणतीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही, त्यामुळे निश्चिंत आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची हिंमत परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक केले तरी चालेल मी घाबरत नाही, अशी स्पष्ट भूमिका राजापूरचे आमदार तथा ठाकरे सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी मांडली.राजन साळवींनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मला नोटीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरी ऑफिसची नोटीस आहे. तसेच चौकशीचा मोर्चा मोठे भाऊ दीपक साळवी यांच्याकडे वळवला आहे. दीपक साळवी यांना चौकशीसाठी घेऊन या अशी नोटीस आली आहे. चौकशीसाठी आम्ही हजर राहणार आहोत, असं राजन साळवींनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंध विभाग सर्व कुटुंबाला वेठीस धरत आहेत, असा आरोपही राजन साळवी यांनी केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button