
मालवण तारकर्ली रांजेश्वरमंदिर नजीक समुद्रात बुडालेल्या नऊ वर्षीय मुलीला आणि तिच्यासमवेत असलेल्या नातेवाईकाला वाचविण्यास स्थानिक ग्रामस्थांना यश
मालवण तारकर्ली रांजेश्वरमंदिर नजीक समुद्रात बुडालेल्या नऊ वर्षीय मुलीला आणि तिच्यासमवेत असलेल्या नातेवाईकाला वाचविण्यास स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे.मालवण तारकर्ली रांजेश्वरमंदिर नजीक समुद्रात कर्नाटक बेळगाव येथील पाच ते सहा पर्यटक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी तिघे तरुण व दोन लहान बालकांचा समावेश होता. के. के. वृंदा ही खोल समुद्रात बुडाली असता तिचा मामा व आई पोहत तिला वाचविण्यासाठी गेले. हे तिघेजण बुडत असल्याचे पाहून तारकर्ली येथील गणपत मोंडकर होमगार्ड रुक्मांनंद लोणे, वैभव सावंत, बाबली चोपडेकर, महेंद्र चोपडेकर व कांचन खराडे हे धावून गेले. बुडत असलेल्या सर्व पर्यटकांना पाण्याबाहेर काढले. तत्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. के. के. वृंदा हिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर तिघांची प्रकृती सुखरूप आहे
www.konkantoday.com