
दापोलीत ओढणीने गळफास घेत आत्महत्या
दापोली : शहरामधील काळकाई कोंड येथील कोकण अपार्टमेंट येथे राहणारे इकबाल बुरोंडकर यांनी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर रोजी घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इकबाल बुरोंडकर हे काळकाई कोंड येथील कोकण अपार्टमेंट येथे वास्तव्याला होते. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी घराच्या बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांची पत्नी शाईन बुरोंडकर यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मोहम्मद मणियार यांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस धक्के देऊन दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश केला असता इकबाल बुरोंडकर हे घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने लटकत असलेले आढळून आले. मोहम्मद मणियार यांनी तत्काळ सुरीच्या साह्याने ओढणी कापली. त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती, तसेच श्वास देखील बंद झालेला होता. म्हणून दापोली पोलीस ठाण्यात तत्काळ कळवून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे नेण्यात आले.