दापोलीत कार झाडावर आदळून पेटली; लाखोंचे नुकसान

पुण्याहून दापोलीकडे येत असणार्‍या वॅगनआर या गाडीला दापोली शहरानजिक असणार्‍या मौजे दापोली येथे अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असणार्‍या आंब्याच्या झाडाला आदळून अचानक आग लागून गाडीचे व अन्य साहित्य मिळून सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल असून सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद गणेश जोशी (वय 43, राहणार- जालगाव) हे दि. 25 रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून येत असताना त्यांची कार आंब्याच्या झाडाला धडकली. त्यानंतर वॅगनआर गाडी क्रमांक एम. एच. 04 जी. झेड. 9342 हिने अचानक पेट घेतला. या आगीत त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने, कपडे व गाडीचे नुकसान असे मिळून सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. या घटनेची खबर दापोली पोलिस ठाण्यात प्रसाद जोशी यांनी दिली असून त्या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक नलावडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button