
मांजर आडवी आल्याने खेडशी येथे दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू
रत्नागिरी : शहरानजिकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्राच्या मागील रस्त्यावर मांजर आडवी आल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला. अनामिका पवार (37, रा. पाली, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. राजेश पवार व अनामिका पवार हे दोघे पती-पत्नी आपल्या मुलाच्या शाळेतील मिटींग आटपून घरी परतत होते. अचानक दुचाकीच्या आडवे मांजर आले. म्हणून पती राजेश यांनी गाडीला ब्रेक लावला. त्यावेळी मागे बसलेली पत्नी अनामिका हिचा तोल जाऊन ती खाली पडली. या अपघातात अनामिकाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.