कॅनिंग कंपन्यांचा मनमानी कारभार, आंबा बागायतदारांकडून आंबा खरेदीच बंद


रत्नागिरीतील हापूस आंबा बागायतदारांसमोरील संकटांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील घसरणीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना आता कॅनिंग कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका बसला आहे. आंबा बागायतदारांच्या लुटीचा प्रश्न समोर आल्यानंतर, लोकप्रतिनिधींनी कॅनिंग कंपन्यांना कडक शब्दांत सुनावले डे होते. मात्र, या इशार्‍याला पूर्णपणे ाप डावलून कॅनिंग व्यावसायिकांनी आता या थेट आंबा खरेदीच बंद करण्याचा अत्यंत टोकाचा पाऊल उचलले आहे. कंपन्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त बनले आहेत.
कॅनिंगसाठी जाणार्‍या आंब्याचे दर ५० रुपयांवरून थेट ३० रुपयांवर आणल्याने बागायतदारानी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले होते. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी शेतकर्‍यांना ५० रुपये प्रति किलो दर देण्याची स्पष्ट सूचना केली होती. कंपन्यांनी आंबा खरेदीच थांबवून प्रशासनाला एक प्रकारे आव्हान दिले आहे. यामुळे शेतकर्‍यांची अवस्था कमालीची वाईट झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button