सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या जलतरणपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी

रौप्य व कांस्य पदकांची कमाई; चिमुकल्या जलतरणपटूंच्या यशाने चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा

चिपळूण : रामतीर्थ जलतरण तलाव, चिपळूण येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली. विविध वयोगटांमध्ये अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या जलतरण कौशल्याचा ठसा उमटवला.

६ वर्षे वयोगटातील मुलींच्या २५ व ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात साईशा प्रसाद परब हिने दोन रौप्यपदके पटकावली. याच वयोगटात स्वराली मानस संसारे हिने दोन कांस्यपदकांची कमाई केली.

८ वर्षांखालील मुलींच्या गटात ५० मीटर फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोक प्रकारात ओवी पंकज कोरडे हिने दोन कांस्यपदके मिळवली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात आयशा खिजर फकीर हिने कांस्यपदक पटकावले. तसेच ४५ ते ५५ वयोगटातील महिलांच्या २५ मीटर फ्रीस्टाईल प्रकारात डॉ. मनीषा वाघमारे यांनी कांस्यपदक मिळवले.

या स्पर्धेत स्पंदना करंदीकर, रिवा हरगुरे, अद्विक कदम, निर्वेद जाधव, अमिना फकीर, आयुष घाडगे, संकल्प मोरे, सिद्धांश चव्हाण, विवान रहाटे, स्वराज जाधव, आभा जोशी आणि अरुण बिष्णोई यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.

या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय जलतरणपटू व NIS प्रशिक्षक स्नेहा सदाशिव रहाटे तसेच विनोद केशव राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button