
उमरोली येथे गोठ्यातील वासरू बिबट्याने ओढत नेऊन केले फस्त
चिपळूण : तालुक्यातील उमरोली अरमरेवाडी येथील पांडुरंग विश्राम भडवळकर यांच्या घराच्या मागील बाजूस गुरे बांधण्यात आली होती. शुक्रवार 27 रोजी रात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करून एका वासराचा फडशा पाडला आहे. सकाळी ही घटना भडवळकर यांनी पाहिली आणि याची खबर त्यांनी पोलिस पाटील यांना देऊन पंचनामा करण्यात आला. बिबट्याने घराच्या परिसरात घुसून बांधलेल्या गुरांमधून एका वासरावर झडप टाकून त्याचा फडशा पाडला. त्याला तेथून ओढत नेत घराच्या कंपाउंडमध्ये एका बाजूला नेऊन खाल्ले.