महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या८८ वर पोहोचली,राज्य सरकार आज नवी नियमावली जाहीर करणार

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात २३नव्या बाधितांची नोंद झाली.
सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच ६००पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात १ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली. टास्क फोर्सच्या बैठकीत नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या वेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यावर देखील चर्चा झाली. राज्य सरकार आज नवी नियमावली जाहीर करणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button