भोके रेल्वेस्टेशनमध्ये घुसून बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा

रत्नागिरी नजीकच्या भोके
स्टेशनमध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या शिरला आणि कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या कुत्र्याची मान पकडून तो पसार झाला.
हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीत कॅमेराबद्ध झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. त्याला रेल्वेच्या सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील भोके रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. बिबट्याच्या दर्शनाने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीपासून काही मिनिटांच्या अंतरावर भोके स्टेशन आहे. स्टेशन परिसर जंगलाचा असल्याने परिसरात रानटी जनावरांचा वावर असतो. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्या भक्ष्याचा अंदाज घेत स्टेशनवर आला. अलगद पावलांनी स्टेशनच्या गॅलरीत येऊन त्याने झोपलेल्या कुत्र्याला हेरले. सावज टप्प्यात येताच त्याची मानगुटी पकडून तेथून जंगलाच्या दिशेने पसार झाला. या प्रकाराने घबराट उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button