अकरावी प्रवेश परीक्षा (सीईटी) साठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व मोरया क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी तालुका आणि मोरया क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी तालुका अध्यक्ष श्री सुरज शेट्ये यांच्या संकल्पनेतून अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. हे वर्ग सोमवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१ पासून ते १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहेत. यामध्ये प्राध्यापक प्रसाद कदम(M.Tech C.O.E pune), प्राध्यापक अभिजित तोडणकर (M.Sc), सौ. शेफाली अंबिके(माजी एचआर मॅनेजर रिलायन्स इन्फोटेक) हे तज्ञ व अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन वर्ग यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष श्री संकेत कदम आणि विद्यार्थी शहर अध्यक्ष ॲड. साईजीत शिवलकर विशेष मेहनत घेत आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी तालुका यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी श्री.सुरज शेट्ये- 9890617222,श्री.संकेत कदम- 9011831800, श्री. साईजीत शिवलकर- 8378818576 यांना आपण संपर्क करू शकता.

खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/ER3ie3x5sHf3dkaw4bg1Fa

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button