गोकुळ मुंबईतील पॅकिंगचा ठेका बंद करून स्वत:च पॅकिंगचा प्रकल्प सुरू करणार,आठ ते दहा कोटी रुपयांची बचत

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मुंबईतील पॅकिंगचा ठेका बंद करून स्वत:च पॅकिंगचा प्रकल्प सुरू करणार आहे. त्यासाठी वाशी येथील गोकुळ संघाच्या शेजारीच असलेली पंधरा गुंठे जागा खरेदी केली आहे. ही खरेदीची प्रक्रिया पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही तासांत पार पाडली. यामुळे ‘गोकुळ’ची वर्षाला आठ ते दहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात येते.
‘गोकुळ’ निवडणुकीत पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दूध उत्पादकांना दरवाढ देण्याबरोबरच संघामध्ये चाललेली उधळपट्टी थांबविण्याचा शब्द दिला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button