
एसटी बस गेली का असे विचारत अज्ञात इसमाने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविले
दापोली तालुक्यातील नवशी फाट्यावरून नवशी गावाकडे चालत जात असलेल्या संगिता विजय पाटील या महिलेला जंगलमय भागात अडवून एका अज्ञाताने पन्नास हजार चारशे रूपयाचे गळ्यातील मंगळसूत्र आणि वीस हजार रूपयाची चेन तोडून पोबारा केल्याची घटना काल १६ मार्च रोजी घडली
कुंभवे येथील संगिता विजय पाटील ह्या मंगळवारी ११.००वा.सुमारास काही कामासाठी नवशी गावात जात होत्या नवशी फाट्यावरून त्या चालत जात असताना त्यांना एक अज्ञात इसम रस्त्यावर भेटला व आत जाणारी एस. टी. बस गेली का विचारले तेव्हा त्यांनी मला माहीत नाही असे सांगून पुढे निघाल्या तेव्हा तो इसम पाठीमागून येऊन पाटील यांच्या गळ्यात हात घालून गळ्यातील मंगळसूत्र व चैन हिसकावून घेत असताना दोघांमध्ये झटापट झाली यावेळी चोरट्याने ओरडलीस तर ठार मारून टाकील असे म्हणत ५०हजार४०० रु चे मंगळसूत्र व २०हजार रु किमतीची चैन गळ्यातून तोडून जंगलमय भागात पळून गेला
याबाबत पोलीस तपास सुरू आहे
www.konkantoday.com