
गतवर्षी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नाट्य संस्थांना वर्ष उलटूनही खर्चाची व बक्षिसाची रक्कम मिळाली नाही
गतवर्षी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील २२ संघांची नाटके सादर झाली. या नाट्य संस्थांना प्रत्येकी पाच हजार रुपये निर्मितीखर्चासह विजेत्या प्रथमसाठी ४० हजार रुपये, द्वितीयसाठी ३० हजार आणि तृतीयसाठी २० हजार रुपये रकमेसह वैयक्तिक पारितोषिकांची अशी सुमारे अडीच लाखांची रक्कम शासनाकडेच अडकली आहे. पदरमोड करून, प्रसंगी कर्ज काढून स्पर्धेत नाट्य संस्थांनी नाटक उभे केले. ही रक्कम कोरोना महामारीच्या काळात मिळणे आवश्यक आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक नाट्यसंस्थांनी पदरमोड करून हा खर्च केला; पण शासनाने खर्च अद्याप दिला नसल्याने नाट्यसंस्था व रंगकर्मी यांची आर्थिक कोंडी झाली आहे
www.konkantoday.com