
रत्नागिरी जिल्ह्यातील युवक नेते बंटी वणजू यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबाच्या विचारांनी प्रेरीत होऊन खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थिती आज जाहीर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
बंटी वणजू यांची पक्षाने तात्काळ दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी पक्षाने श्री.देवेंद्र(बंटी)वणजू यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे
जिल्ह्यातील युवा नेते व कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे श्री. देवेंद्र(बंटी) सदानंद वणजू यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यावर त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, कुमार शेट्ये, शहर अध्यक्ष निलेश भोसले माजी नगराध्यक्ष मिलिंद किर उपस्थित होते
www.konkantoday.com