देशभरात १,३०२ डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला असून, ९९ जणांचा मृत्यू

देशभरात १,३०२ डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला असून, ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी ही धोक्याची घंटा असून, वैयक्तिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केले आहे.
करोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर हा महत्त्वाचा भाग आहेत. परंतु अनेक ठिकाणी वैद्यकीय आस्थापनांमध्ये संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी उपाययोजना न केल्याने वरिष्ठ डॉक्टरांसह तरुण डॉक्टरांनाही जीव गमवावा लागला आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार, देशभरात ८ टक्के डॉक्टरांना करोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये ५८६ डॉक्टर, ५६६ निवासी डॉक्टर आणि १५० शल्यविशारदाचा समावेश आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button