
राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार
राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शनिवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.एकूण परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी सांगितलं.
www.konkantoday.com