
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागात गवारेड्यांचा वाढता वावर
संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागात वन्यजीवांचा वावर कमालीचा वाढला असून, आता चक्क मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांवर गव्यांचे कळप दर्शन देऊ लागले आहेत. मुचरी येथील रहिवासी योगेश सप्रे हे देवरुख येथे जात असताना, सोनवडे-कोसुब घाटी मार्गावरील कोसुब बौद्ध वाडीनजिकच्या एका मोठ्या वळणावर अचानक १० ते १२ गवे रेडे आणि एका छोट्या पाडसाने मुख्य रस्ता रोखून धरला. गव्यांच्या या महाकाय कळपाने रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.www.konkantoday.com



