
चिपळूण कराड मार्गावर अपघात
चिपळूण-कराड चिपळूण मार्गावरील गजमल पिंपळी येथे झायलो व मोटार सायकलच्या झालेल्या अपघातात शृंगारतळी येथील अश्विनी राजेंद्र शिंगाडे ( 29 ) ही महिला जागीच ठार झाली तर तिचे पती राजेंद्र विलास शिंगाडे ( 30 ) गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.