
500 कोटींची ऑडिओ क्लिप प्रकरण! घाबरलात म्हणून माझ्याकडं बोट दाखवताय, पण माझ्याकडे खूप मसाला, सगळं सत्य बाहेर येईल, रामदास कदमांचा जरांगे पाटलांवर पलटवार
: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडून (SIT) सुरू आहे.याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काल (बुधवारी) एसआयटीचे पथक मनोज जरांगे यांच्या घरी दाखल झालं होतं. जवळपास दोन तास पथकाने जरांगे यांच्याकडे चौकशी केली होती. दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यानंतर आता रामदास कदम यांनी जरांगे पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. घाबरला आहात म्हणून माझ्याकडे बोट दाखवता असा टोला रामदास कदमांनी जरांगेंना लगावला. माझ्याकडे खूप मसाला आहे. मात्र चौकशीतच सर्व सत्य बाहेर येईल. एकनाथ शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी सुरु असल्याचे रामदास कदम म्हणाले.कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच माझ्याकडे बोट दाखवत आहेत, अशा शब्दांत कदम यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती. ती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आली, तेव्हा मी त्यावर बोललो, असंही कदम यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींचे कथित आरोप करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी लावली आहे. त्यामुळे सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.माझ्याकडे खूप काही मसाला आहे, मात्र सध्या मला काही बोलायचं नाही. चौकशीत जे काही आहे ते निष्पन्न होईल,’ असं सूचक विधान करत रामदास कदम यांनी या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आता रामदास कदम यांच्या या पलटवारावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.




