
राजापूर तालुक्यातील निनाद शिवगण बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
कोंडये खालचीवाडी येथील २८ वर्षीय तरुणाचा २० नोव्हेंबरपासून शोध; माहिती मिळाल्यास राजापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
राजापूर : तालुक्यातील कोंडये खालचीवाडी येथील निनाद किशोर शिवगण (वय २८) हे २० नोव्हेंबर २०२६ पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याकडून शोधमोहीम सुरू असून, त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजापूर पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केलेल्या शोधपत्रिकेनुसार, निनाद शिवगण यांची उंची सुमारे सहा फूट असून, मध्यम बांधा, गोरा रंग आणि गोलसर-उभट चेहरा आहे. त्यांचे केस काळे असून, त्यांना बारीक दाढी व मिशी आहे. बेपत्ता झाले त्यावेळी त्यांच्या अंगात निळ्या व पांढऱ्या रंगाचा चौकडीचा (चेक्स) शर्ट होता.
त्यांच्याकडे पोको (POCO) कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असून, त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड वापरात आहे.
माहिती मिळाल्यास संपर्क साधा :
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव – ८५९१३९६७१०
हर्षदा चव्हाण – ९४२११८७२६५
बेपत्ता निनाद शिवगण यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास वरील क्रमांकांवर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राजापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.




