त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरीत दीपोत्सव साजरा

रत्नागिरी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी १५५१ दिवे प्रज्वलित करून भगवान महादेवांना वंदन करण्यात आले.

महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केल्याच्या स्मरणार्थ त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरांमध्ये दीपप्रज्वलन करण्याची परंपरा आहे. याच भावनेतून तसेच ‘जिथे छत्रपती शिवाजी महाराज, तिथे शिवमंदिर’ हा विचार मनात ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात रत्नागिरीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button