तिरुपती बालाजी चरणी १२१ किलो सोन्याचे गुप्तदान! कोट्यवधींची संपत्ती अर्पण करूनही भक्ताने नाव उघड केले नाही;


आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे एक भक्ताने मोठे दान दिले आहे. या अज्ञात भक्ताने भगवान बालाजींना केलेले दान देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.चेन्नईतील एका अनिवासी भारतीय व्यावसायिकाने भगवान व्यंकटेश्वर स्वामींना १२१ किलोग्रॅम सोन्याचे दागिने दान केले आहेत. या दागिन्यांचे अंदाजित मूल्य १४० ते १५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या इतिहासात एकाच भक्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांचे दान करण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, त्या व्यावसायिकाने आपली ओळख गुप्त ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.या दानामध्ये एकूण १२१ किलोग्रॅम सोन्यापासून बनवलेल्या ४६ प्रकारच्या दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये भगवानांचा मुकुट, भुजकीर्ती, शंखचक्र, वड्डणम आणि अभय हस्त यांचा समावेश आहे. हे दागिने नऊ वेगवेगळ्या संचांमध्ये बनवलेले आहेत.हे दागिने टीटीडी अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार आणि आगम शास्त्राच्या नियमांनुसार तयार करण्यात आले होते. ते पूर्ण होण्यासाठी अंदाजे १५ महिने लागले. सोन्याच्या सध्याच्या दरानुसार, त्यांचे एकूण मूल्य १४० ते १५० कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

व्यवसायाच्या वाढीचे श्रेय देवाला

ही देणगी चेन्नईतील एका अनिवासी भारतीय व्यावसायिकाने दिली आहे. त्यांचा विश्वास आहे की, भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला आहे. त्यामुळे, त्यांनी आपल्या कंपनीच्या नफ्याचा काही भाग सोन्याच्या दागिन्यांच्या रूपात देवतेला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

या व्यावसायिकाला आपली देणगी सार्वजनिक व्हावी असे वाटत नाही. त्यामुळे, त्यांनी आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. असे वृत्त आहे की, त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनाही आपली ओळख उघड न करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button