निवृत्ती वेतनधारकांसाठी ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेट’ सादर करण्याचे आवाहन. कोषागार कार्यालये व बँकांमध्ये विशेष सोय


रत्नागिरी, दि. 23 ):- नोव्हेंबर महिन्यात सादर कराव्या लागणाऱ्या हयातीच्या दाखल्यासाठी (Life Certificate / जीवन प्रमाणपत्र) केंद्र व राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल पद्धतीचाच अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक जण बँकेतील यादीवर सही करून किंवा पारंपरिक पद्धतीने हयातीचा दाखला सादर करत असले, तरी यंदापासून दाखला डिजिटल स्वरूपातच सादर करण्यावर शासनाचा आग्रह असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. निवृत्तीवेतनधारकांनी विलंब न करता लवकरात लवकर डिजिटल अर्थात ऑनलाइन पद्धतीने आपले लाईफ सर्टिफिकेट सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार केल्यास त्याची कार्यपद्धती समजून घेण्यास मदत होते आणि पुढील वर्षांपासून हयातीच्या दाखल्यासाठी दरवर्षी बँकेत अथवा कोषागारात जाण्याची गरज भासणार नाही.
डिजिटल प्रमाणपत्र कसे काढाल आणि कुठे मिळेल मदत?
निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या ग्रुपवर यासंदर्भातील मार्गदर्शक व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत.
प्रक्रिया अवघड वाटल्यास तालुक्याच्या तहसील आवारातील संबंधित उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा; तेथे डिजिटल प्रमाणपत्र तयार करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोबत कोणती कागदपत्रे न्यावीत?
कोषागार कार्यालय किंवा बँकेत जाताना निवृत्तीवेतनधारकांनी खालील माहिती/कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पीपीओ क्रमांक (Pension Payment Order No.), बँक खाते क्रमांक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button