एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. हेलिकॉप्टर बिघडल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली होती. हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा अचानक प्रॉब्लेम झाल्यानं एकनाथ शिंदे बराच वेळ हेलिपॅडवर थांबले होते.एकनाथ शिंदे यांचा आज पंढरपूर दौरा होता, त्यानंतर ते हेलिपॅडवर आले होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झाल्यानं ते सुरु होऊ शकलं नाही. यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक अधिकारी देखील हेलिपॅड परिसरात उपस्थित होते.

एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते ते सुरु न झाल्यानं त्यांना किमान 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबले होते. संबंधित हेलिकॉप्टर एअर इंडियाचं असल्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टरची बॅटरी बदलण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दुसरी बॅटरी आल्यानंतर हेलिकॉप्टर सुरु होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. अखेर एकनाथ शिंदे रस्ते मार्गे सोलापूरला रवाना झाले.

एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर बंद पडल्यानं त्यांनी रस्त्यानं प्रवास करत सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर तांत्रिक दुरुस्ती न झाल्यानं एकनाथ शिंदे यांना रस्ते मार्गानं पुण्याकडे जावं लागलं आहे. पुण्यातून एकनाथ शिंदे पुढील प्रवास विमानानं करतील अशी शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button