गोरेगाव रेल्वे स्थानकात नशेत महिलेचा गोंधळ; मोटरमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न


मुंबई : गोरेगाव रेल्वे स्थानकावर एका महिलेने नशेच्या अवस्थेत गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला मोटरमनच्या केबिनमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याने रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये वीस-बावीस वर्षांच्या आसपासची एक महिला मोटरमनच्या केबिनच्या दरवाजाजवळ उभी असल्याचे दिसते. तिने दोन्ही हातांनी केबिनच्या दरवाजाचे हँडल पकडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी ती विचित्र हालचाली करत असल्याचेही दिसून येते.

मोटरमनची केबिन हा प्रवाशांना प्रवेश नसलेला प्रतिबंधित भाग असताना महिलेने तेथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, व्हिडिओतील महिलेची नेमकी ओळख, तिच्यावर कोणती कारवाई झाली किंवा घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button