युवासेनेचे उपशहर प्रमुख रोहित मायनाक यांचे माणुसकीचे दर्शन; गरजू रुग्णासाठी रक्तदान!

रत्नागिरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका युवक रुग्णाला अत्यंत तातडीने AB पॉझिटिव्ह (AB+) रक्ताची आवश्यकता होती. यासाठी युवासेनेचे पदाधिकारी रक्तदात्याचा शोध घेत असताना युवासेनेचे उपशहर प्रमुख रोहित मायनाक यांचा रक्तगट AB पॉझिटिव्ह असल्याचे समजले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोहित माईनाक यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेत रक्तदान केले आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

त्यांच्या या स्तुत्य व माणुसकीपूर्ण कार्याची दखल घेत युवासेना रत्नागिरी शहरच्या वतीने रोहित माईनाक यांचा पुष्पगुच्छ व रोप देऊन सन्मान करण्यात आला.

रक्तदात्यांच्या मदतीसाठी युवासेना २४×७ तत्पर!

रत्नागिरी शहरातील कोणत्याही गरजू रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता भासल्यास युवासेना रत्नागिरी शहरचे पदाधिकारी २४ तास, सातही दिवस (24×7) रक्तदात्यांचा शोध घेऊन रक्त उपलब्ध होण्यासाठी मदत करण्यास सदैव तत्पर राहतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“रक्तदान हेच श्रेष्ठदान, माणुसकी हाच खरा धर्म!”

युवासेना रत्नागिरी शहर

** अभिजीत दुडे – नगरसेवक*
8788096634
** सर्वेश शेलार – युवासेना उपशहर प्रमुख* 7038228885

** रोहित मायनाक – युवासेना उपशहर प्रमुख* 8830409612

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button