मंगल कार्यालयातील हँडबॅगमधून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला

चिपळूण : सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी आलेल्या महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. १ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या चोरीप्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत जागृती संदेश मोरे (वय ३२, व्यवसाय स्टेशनरी, रा. नाना सोसायटी, कोपरी, ठाणे पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र त्यांनी आईकडे ठेवण्यासाठी दिले होते. आईने हे मंगळसूत्र शारदा मंगल कार्यालयात असताना आपल्या हँडबॅगमधील एका बॉक्समध्ये ठेवले होते. मात्र, याच दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून ४४.४८० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लंपास केले.

चोरीला गेलेल्या मंगळसूत्राची किंमत १ लाख ८७ हजार ३४९ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणारा संशयित अद्याप अज्ञात असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button